गोंदिया: देवरी चेक पोस्टवर खा.प्रशांत पडोळे चेआंदोलन; आरटीओकडून अवैध वसुलीचा केला आरोप; पण स्थानिकांचा दबाव बघता……!
गोंदिया:- महाराष्ट्रछत्तीसगड सीमेवर देवरी तालुक्यातील शिरपूर येथे आरटीओ चेक पोस्टवर वाहन चालकांकडून अवैध वसुलीचा धंदा सुरू असल्याची तक्रार आल्यानंतर खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांनी आंदोलन सुरू केल्याचा प्रकार शनिवारी रात्री घडला. गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्रात आपल्या आगळ्यावेगळ्या कार्यपद्धती करिता ओळखले जाणारे गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्रातील खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांना गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील शीरपूर चेक पोस्ट वर ट्रक चालकांकडून आरटीओ अवैधरित्या पैसे वसुल करीत असल्याची माहिती मिळाली असता. गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी माहिती मिळताच पुन्हा त्यांनी आपल्या कार्यर्त्यांना सोबत देवरी (शिरपूर) चेक पोस्ट येथे सुरु असलेला गौडबंगाल उघडकिस आणला आहे.
या पूर्वी पण खा डॉ. प्रशांत पडोळे यांनी दोन वेळा याच आरटीओ चेक पोस्ट वर भेट देत घडत असलेला गैर प्रकार बंद करण्यात यावा अशी मागणी केली होती. गोंदिया जिल्ह्यातील देवरी चेक पोस्टवर शनिवार रात्रीच्या सुमारास येथे होत असलेल्या अवैध वसुली विरुद्ध आंदोलन छेडले. मुंबई कोलकत्ता राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या या चेक पोस्ट वर ट्रक चालकांकडून आरटीओ अधिकारी स्थानिक लोकांच्या मदतीने अवैध वसुली करीत असल्याचा गंभीर आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली.
या आंदोलना दरम्यान खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्याच्या टोकावर असलेल्या या चेक पोस्टवरून ट्रक शेजारील छत्तीसगड राज्यात प्रवेश करतात इथून जाणाऱ्या मालवाहतूक ट्रक चालकांकडून नियमांच्या नावाखाली अतिरिक्त रक्कम उकळली जात आहे. यामुळे चालक आणि वाहनमालकांना आर्थिक फटका बसत असून वाहतूक व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. पारदर्शक कारभार व्हावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी,ङ्घ अशी मागणी केली.
आंदोलनामुळे काही काळ चेक पोस्टवरील कामकाज ठप्प झाले होते. पण आरटीओ अधिकाऱ्यांनी ट्रक चालकांन कडून अवैध रित्या पैसे वसुल करण्यासाठी काही स्थानिक लोकांना चेक पोस्ट वर कामाला ठेवले आहे. ज्यांचे पोटापाण्याच्या प्रश्न या कामातूनच निभावले जातो त्यांनी आपल्या घरातील महिला आणि मुलांना बोलावून खासदारांचा घेराव केला. आरटीओ आम्हाला रोजगार देतात त्यामुळे आमचं घर चालतो..तुम्ही रोजगार देणार का असा प्रश्न उपस्थित केला आहे…त्यामुळे अधिकारीच स्थानिक लोकांना घेऊन अवैध वसुली करत असल्याचं याठिकाणी सिद्ध झालं. दरम्यान खासदार स्थानिक नागरिक आणि अधिकारी यांच्यात बराच वेळ चाललेल्या बचाबाची मुळे काही काळापर्यंत या ठिकाणी गोंधळ निर्माण झालेला होता.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पण स्थानिक लोकांच्या वाढता दबाव बघता परिस्थिती अधिकच चिडत असल्याचे बघून खासदारांनी आपल्या कार्यकर्त्यासोबत या ठिकाणाहून निघून जाण्यास प्राथमिकता दिली.प्रशासनाकडून याबाबत चौकशीचे आश्वासन देण्यात आले असून, लवकरच अहवाल सादर केला जाईल, असे सांगण्यात आले. दरम्यान, आरटीओ अधिकाऱ्यांनी अवैध वसुलीचे आरोप फेटाळून लावत, “नियमांनुसारच कारवाई केली जाते,’ असे स्पष्ट केले. पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









