बेला ग्रामपंचायत सुशासन युक्त ग्रामपंचायत

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत बेला सुशासन युक्त पंचायत म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायत हे भारतातील पहिले नेट-झिरो पंचायत म्हणून घोषित करण्यात आले आहे. या पंचायतीने नागरी सेवा सुविधा, तक्रार निवारण, वेबसाईट, सीसीटीव्ही कॅमेरे, सर्व सभा अद्यावत, ग्रामविकास समितीचे गठण, मेरी पंचायत, पंचायत निर्णय, आयुष्य मान भारत कार्ड, दिव्यांग ओळखपत्र व व्यापक पर्यावरणीय कार्य केले आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, सार्वजनिक इमारतींवर सौर पॅनेलची स्थापना, स्वच्छ अन्न शिजवण्याचे इंधन वापरणे, घरगुती कचरा वेगळे करणे आणि सिंगल-यूज प्लास्टिकचा वापर कमी करणे यांचा समावेश आहे. या कार्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी करण्यात मदत झाली आहे. बेला ग्रामपंचायतीला २०२४ मध्ये कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत पुरस्कार मिळाला आहे. या पंचायतीचे सरपंच शारदा गायधने यांच्या नेतृत्वाखाली, बेला ग्रामपंचायतीने स्थानिक पर्यावरणीय उपक्रमांना प्रोत्साहन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *