कृषीपंपाला २४ तास विद्युत पुरवठा करा ची मागणी; शेतकरी धडकले महावितरण कार्यालयावर; ८ तासाच्या विद्युत पुरवठ्याने पीक धोक्यात
गोंदिया:- सडक अजर्ुनी तालुक्यातील बोपाबोडी, माहुली व बिरी येथील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना ४ दिवसापूर्वी २४ तास विद्युत पुरवठा केला जात होता. परंतु महावितरणच्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता मागील ३ ते ४ दिवसापासून कृषी पंपांना फक्त ८ तास विद्युत पुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे ८ तासाच्या विद्युत पुरवठ्याने शेतपीक धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना किमान १२ ते १६ तास विद्युत पुरवठा देण्यात यावाया मागणीला घेऊन आज सडक अजर्ुनी येथील उपविभागीय महावितरण कार्यालयावर शेकडोच्या संख्येने शेतकरी धडकले.
मागण्यांची पूर्तता करण्यात आली नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्याच्या इशारा निवेदनाच्या माध्यमातून महावितरणच्या उपकार्यकारी अधिकारी सुनील रेवतकर यांना दिला आहे. यंदाच्या रब्बी हंगामात धान पिकासह मका व इतर पिकांची सुद्धा लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. यावर्षीच्यारब्बी हंगामा ची धान पिकाची लागवड करण्यापूर्वी शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा करण्या संदर्भात कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना देण्यात आली नाही. आणिअचानक मागील तीन ते चार दिवसांपासून कृषी पंपाचे विद्युत पुरवठ्याचे तास कमी करून फक्त ८ तास विद्युत पुरवठा सुरू करण्यात आलाआहे. मात्र या संदर्भात शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता स्वतःच्या मनमर्जीने विद्युत पुरवठा सुरू करण्यात आल्याने धान पिकासह इतर पीक ही धोक्यात आले आहे.
ही परिस्थिती कायमस्वरूपी राहिली तर शेतकरी आर्थिक संकटात सापडणारअसल्याने. कृषी पंपांना किमान १२ ते १६ तास विद्युत पुरवठा देण्यात यावा या प्रमुख मागणीला घेऊन २४ फेब्रुवारी रोजी सडक अजर्ुनी येथील उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात शेकडोच्या संख्येने शेतकरी धडकले असून मागण्यांच्या पूर्ततेसाठी निवेदनही उपकार्यकारी अभियंता यांना दिले आहे. मागण्या तात्काळी निकाली न निघाल्यास यापुढे सुद्धा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनाच्या माध्यमातून संबंधित विभागाला दिला आहे. उपकार्यकारी अभियंता रेवतकर यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारून किमान तीन दिवस पर्यंत बारा तास वीज देण्याचे आश्वासन दिले. व यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून निवेदनाच्या मागणीनुसार विचार करू असे आश्वासित केले.
परंतु शेतकऱ्यांनी तीन दिवसात कृषी पंपाच्या विद्युत पुरवठ्यात वाढ करण्यात आली नाही तर पुन्हा आपल्या कार्यालयात समोर मोठे आंदोलन उभार असे संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले. निवेदन देताना बोपाबोडी येथील सरपंच निखिल मेश्राम, उपसरपंच गणेश कापगते, सिंदिपार येथील उपसरपंच विशाल पर्वते, शेतकरी भूमेष कापगते, प्रदीप कापगते, धनराज डोंगरवार, प्रशांत कापगते, हरिदास कापगते, रुपेश भुरे, विश्वजीत वासनिक, महेश मेश्राम प्रमोद कापगते, तुषार कापगते, रमेश डोंगरवार, चैतन्य डोंगरवार, रामकृष्ण डोंगरवार, रवींद्र डोंगरवार, शांतीलाल लंजे, पवन बनसोड यांच्या सह शेकडो शेतकरी उपस्थित होते.









