तीन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांना मेघगर्जना आणि विजांसह पावसाचा इशारा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या पुढील पाच दिवसांच्या हवामान अंदाजानुसार राज्यातील विविध भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

१७ जुलै रोजी नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील घाट परिसर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना मेघगर्जना व विजांसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी १८ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, पुणे, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही अशाच स्वरूपाच्या हवामानाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. १९ जुलै रोजी अहिल्यानगर, पुणे, बीड, परभणी, हिंगोली, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. हवामान विभागाने विजांच्या कडकडाटाच्या वेळी उघड्यावर जाणे टाळावे, झाडाखाली थांबू नये, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा तसेच नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *