भाजपा भंडारा शहर उपाध्यक्षपदी अनुप तुरस्कर यांची नियुक्ती

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भारतीय जनता पार्टीच्या भंडारा शहर उपाध्यक्षपदी अनुप तुरस्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भंडारा शहर अध्यक्ष सचिन कुंभलकर यांनी ही नियुक्ती केली आहे. अनुप तुरस्कर यांनी या नियुक्तीचे श्रेय भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. डॉ. परिणय फुके, जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे व इतर ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना दिले आहे. या नियुक्तीबद्दल अनुप तुरस्कर यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *