सिहोरा येथे पोलिसांची गुन्हे आढावा बैठक

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्हा पोलीसांची गुन्हे आढावा बैठक हि नेहमी जिल्हा मुख्यालयाचे ठिकाणीच आयोजीत करण्याची महाराष्ट्र पोलीस दलाची परंपरा आहे. परंतु भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्विकारल्यापासुन त्यांनी त्यांच्या अभिनव संकल्पनेतुन भंडारा जिल्हा पोलीसांची गुन्हे आढावा बैठक जिल्हा मुख्यालयाबाहेर घेण्यात येतील असे सांगीतले होते. त्यानुसार सिहोरा येथे भंडारा पोलीसांच्या मासीक गुन्हे आढावा बैठकी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यातील प्रलंबित गुन्ह्यांचा तपास, कायदा व सुव्यवस्था आणि गुन्हेगारी नियंत्रणाचा आढावा घेऊन अधिनस्थ अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने आज, दि. १८ फेब्रु.०२६ रोजी पोलीस ठाणे सिहोरा येथे मासिक बैठक पार पडली.

भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत, तपासातील गती वाढवणे आणि आगामी काळातील पोलीस बंदोबस्ताचे सूक्ष्म नियोजन करण्यावर भर देण्यात आला. जिल्ह्याची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. बैठकीदरम्यान, फेब्रुवारी २०२६ या महिन्यात गुन्हे तपास, प्रतिबंधात्मक कारवाई आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक महोदयांच्या हस्ते कौतुक करण्यात आले. गुन्हे आढावा बैठकीनंतर पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी सिहोरा परीसरातील नागरीक तसेच पोलीस पाटील यांचेशी प्रत्यक्ष संवाद साधुन त्यांची बैठक घेतली तसेच त्यांच्या अडी अडचणी जाणुन पोलीस दलाची निगडीत समस्यांचे समाधान करण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *