तरुणांवर लावलेले गुन्हे रद्द करण्यासाठी आ. भोंडेकर यांचा पुढाकार

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा शहरा जवळील खोकरला येथे काही तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, या मागणीसाठी भंडारा विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पुढाकार घेतला. आपल्या विधानसभेतील विविध गावांमध्ये या प्रकरणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा पोलीस निरीक्षक नुरुल हसन यांच्यासोबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीस शिवसेनेचेलोकसभा समन्वयक संजय कुंभलकर, जिल्हा प्रमुख अनिल गायधने, उपजिल्हा प्रमुख सुरेश धुर्वे, जिल्हा संघटक नितीन धाकते, लोकसभा युवासेना प्रमुख मुकेश थोटे, जिल्हा युवासेना प्रमुख राजेश चोपकर, नेते विकास मदनकर, शैलेंद्र श्रीवास्तव, दीपक श्रीवास्तव, विश्व हिंदू परिषदचे विदर्भ सहमंत्री प्रकाश पांडे व जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरवार तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. संबंधित तरुणांवरील गुन्हे मागे घेऊन परिसरात शांतता, सलोखा आणि सामाजिक एकोपा अबाधित राहावा, या हेतूने सकारात्मक व विधायक चर्चा करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असलेली जनभावना लक्षात घेऊन न्याय्य तोडगा निघावा, यासाठी आ. भोंडेकर प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *