करडी पोलिसांची अवैध रेती वाहतुक करणाऱ्या टिप्परवर कारवाई

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा ः- रात्रीच्या वेळी टिप्पर क्र. एमएच २७ बिएक्स ४१३४ मध्ये अवैधरित्या रेती वाहतुक करतांना करडी पोलिसांनी टिप्पर पकडला. टिप्पर व रेती असा एकूण ३५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सविस्तर असे की, करडी पोलीस रात्रीच्या वेळी देव्हाडा (खु) गावाच्या हद्दीत ऐलोरा पेपर मिल परिसरात पेट्रोलींग करीत होते. तेव्हा त्यांना पाटील टोला ते देव्हाडा रोड वर स्मशान भुमी जवळ एक अशोक लिलाड कंपनीचा १० चक्का टिप्पर क्र. एम. एच. २७ बि. एक्स.४१३४ दिसला. त्याला थांबविले असता विना परवाना रेती वाहतुक करीत असल्याचे दिसले.

आरोपी चालक आशिष कैलाश मेश्राम (वय २४)रा. गिरोला, ता. जि. भंडारा व मालक समिर नारनवरे (वय ३०) रा. कोथुर्ना, ता. जि. भडारा यांनी ही रेती वैनगंगा नदीतून विना रॉयल्टीने आणल्याचे सांगितले. त्यांचेवर पोलीस स्टेशन करडी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. टिप्पर व रेती असा एकूण ३५ लाख ३० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, सहा. पोलीस निरीक्षक नागलोत यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार मडावी यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *