बंद पडलेल्या एलोरा पेपर मिलमध्ये नवीन उद्योग सुरु करा
दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द हद्दीत असलेल्या गोयका इंडस्ट्रीज च्या माध्यमातून एलोरा पेपर मिल करीता शासकीय जागा शंभर ते दिडशे एकर जमिन लिजवर घेण्यात आले होते आणि त्या ठीकाणी कर्मचारी मजुर काम करीत होते. सदर कंपनी बंद पडली असल्यामुळे अनेक कर्मचारी व मजुर बेरोजगार झाले आहेत. समजा त्याच जागेवर एखादी मोठी कंपनी आल्यास पुन्हा जिल्ह्यातील सुशिक्षित युवकांना बेरोजगारांना संधी मिळेल. त्यामुळे राज्यशासनाच्या माध्यमातून कंपनी आणावी व जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध होईल जेणेकरून युवकांना रोजगार साठी भटकण्याची गरज पडणार नाही.
एलोरा पेपर मिल सुरू असताना जिल्ह्यातील कित्येक कर्मचारी उदर निर्वाह करीत परीवाराचा प्रपंच चालत होते. परंतु कंपनी बंद झाल्यामुळे सर्व कर्मचारीवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे नव्याने उद्योग निर्मिती करुन काम तरी मिळेल यासाठी करडी जि. पं. क्षेत्राचे माजी जि. पं. सदस्य महेंद्र शेंडे यांनी भंडारा गोंदिया विधानपरिषदेचे आ. परीणय फुके व जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन च्या माध्यमातून मागणी केली आहे. यावेळी विशाल चौधरी, किसनलाल कांबळे, श्रीराम बिसने, संतोष वहीले, रामप्रसाद मेश्राम उपस्थित होते.









