नागपूर येथील गुन्ह्यातील पाच फरार आरोपींना धनेगाव येथून अटक, सिहोरा पोलिसांची कारवाई

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा ः- एमआयडीसी पोलीस स्टेशन नागपूर येथील गुन्ह्यात फरार असलेल्या पाच आरोपींना जवळच्या धनेगाव येथे सिहोरा पोलिसांनी अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, धनेगाव येथे काही अनोळखी व्यक्ती लपून राहत असल्याची माहिती सिहोरा पोलिसांना मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत सिहोरा पोलीस पथकाने धनेगाव येथे धाड टाकून पाचही जणांना ताब्यात घेतले.

चौकशी दरम्यान त्यांनी आपली नावे कांचन उर्फ लहान भाऊ ठाकरे (वय २२), आदर्श उर्फ आदु गौतम बनसोड (वय २२), समीर रवींद्र गजभिये (वय १८), अभय अशोक पोंगडे (वय २४), सर्व राहणार भीमनगर, नीलडोह, नागपूर आणि आदया उर्फ अमित गणेश भलावी (वय २७) रा. भीमनगर, नागपूर अशी सांगितली.

ताब्यात घेतलेले सर्व आरोपी नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवासी असल्याचे समजताच, सिहोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय कसोधन सांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोकुळ महाजन यांच्याशी संपर्क साधला, असता त्यांचेवर तेथे अपराध क्रमांक १०७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १०९ (१), ११५ (२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल आहे. हे सर्व आरोपी दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ पासून गुन्हा करून फरार झाले होते, अश्ाी माहिती मिळाली. या कारवाईनंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पंकज सयाम आणि त्यांचे पथक सिहोरा येथे दाखल झाले. सिहोरा पोलिसांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पाचही आरोपींना पुढील तपासासाठी नागपूर पोलिसांच्या ताब्यात करण्यात आले. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक विजय कसोधन यांच्या मार्गदर्शनात हवालदार साईराम गयेगये, राजु साठवणे, छविलाल क्षरणागत, लोकेश कुंभरे, पो.शि. लोकेश मेहर यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *