महाशिवरात्रीचा शिवमंदिरात दर्शनासाठी अलोट गर्दी

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- “बम बम भोले, ओम नमः शिवाय, हर हर महादेव’ असा अखंड जयघोष करत महाशिवरात्री निमित्त तुमसर शहरातील तिलक नगर येथील शिवमंदिरात भाविकांची गर्दी बघायला मिळाली. महाशिवरात्रीनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने सजवण्यात आले आहे. मंदिरात दिवसभर सुंदरकांड व विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले. या पवित्र प्रसंगी मंदिर परिसरात विविध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महाप्रसाद वाटप करण्यात आली असून यामध्ये साबुदाणा खिचडी भाविकांना देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *