श्री गायमुख देवस्थान यात्रेसाठी प्रशासनाची उत्कृष्ट व्यवस्था
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही तुमसर येथील गायमुख देवस्थान येथे भव्य यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यावर्षी हजारो भाविकांनी उपस्थिती लावून दर्शनाचा लाभ घेतला. संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रशासनाने केलेल्या सुयोग्य नियोजनामुळे यात्रा अत्यंत सुव्यवस्थित आणि सुरक्षित वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाली. मंदिर परिसरात प्रवेशासाठी विस्तृत मार्ग, प्रशस्त दर्शन रांग आणि गर्दी नियंत्रणासाठी काटेकोर उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी यात्रा समिती व प्रशासनाने दिवस-रात्र मेहनत घेतली. परिणामी संपूर्ण परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि शिस्तबद्ध दिसून आला. आरोग्य, स्वच्छता व मूलभूत सुविधांची आदर्श व्यवस्था, ऑक्सिजनसहसुसज्ज चार बेडचे तात्पुरते रुग्णालय, ठिकठिकाणी मोबाईल टॉयलेट्सची सुविधा, शुद्ध पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था, चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्रपार्किंग, तुमसर, रामटेक, नागपूर मार्गावरील बससाठी स्वतंत्र थांबे, बसस्थानकांवर पाणी व स्वच्छतागृह सुविधा अवैध दारूविक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विशेष पथक सतर्क होते. तसेच वैद्यकीय पथक अखंडपणे कार्यरत राहून भाविकांच्या आरोग्याची काळजी घेत होते.









