गोंदियाला कमी व्होल्टेज व वीज खंडित होण्यापासून मिळणार दिलासा; भारवाढीसाठी प्रत्येक उपकेंद्रात डबल पॉवर ट्रान्सफॉर्मर – आ.विनोद अग्रवाल

गोंदियाः- दररोज वाढत चाललेली कमी दाबाची समस्या, वीज खंडित होणे, लोडशेडिंग, ट्रान्सफॉर्मर जळणे यामुळे गोंदिया शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांचा त्रास शिगेला पोहोचला होता. वीज खंडित होण्याचा सर्वात मोठा परिणाम जलपुरवठ्यावर आणि शेतकऱ्यांच्या सिंचनावर होत होता. यामागील मुख्य कारण म्हणजे कमी क्षमतेचे मेगावोल्ट-अँपिअर (चतअ)चे ट्रान्सफॉर्मर. वाढती लोकसंख्या आणि वाढता वीज वापर असूनही गेल्या ५० वर्षांत यामध्ये कोणताही बदल झाला नाही, त्यामुळे आजची परिस्थिती निर्माण झाली. या सर्व समस्यांची जाणीव ठेवून, गोंदिया शहरासह संपूर्ण गोंदिया विधानसभा क्षेत्रात अखंड आणि उच्चस्तरीय वीजपुरवठा मिळावा यासाठी आमदार विनोद अग्रवाल पुढे सरसावले आणि गेल्या दोन वर्षांत ५० वर्षांनंतर गोंदियाची वीजव्यवस्था बदलताना दिसत आहे.

आमदार अग्रवाल यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आज गोंदिया शहरात वीजभार कमी करण्यासाठी अधिक क्षमतेचे मेगावोल्ट-अँपिअरचे ट्रान्सफॉर्मर बसवले जात आहेत. शहराच्या मध्यभागी नवीन सबस्टेशन तयार केले जात आहे. सूर्याटोला उपकेंद्रात अतिरिक्त १० चतअ चा ट्रान्सफॉर्मर वाढवण्यात आला आहे. तसेच फुलचूर व भीमघाट परिसरातही नवीन उपकेंद्रांची उभारणी सुरू आहे. लवकरच वीजेच्या लपंडावापासून गोंदियाला पूर्णतः मुक्त करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यात गती आली आहे. याचबरोबर चंगेरा येथील मंजूर विद्युत उपकेंद्राचे कामही मार्गस्थ झाले आहे. दासगाव, काटी, परसवाडा, कटंगटोला, रापेवाडा, मुंडीपार चखऊउ या उपकेंद्रांची भारक्षमता दुप्पट करण्याचे काम सुरू आहे. ज्या उपकेंद्रांवर ५ चतअ चे ट्रान्सफॉर्मर होते, त्यांना १० चतअ किंवा दोन उच्चस्तरीय ५ चतअ चे ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम सुरू आहे.

अलीकडेच आमदार अग्रवाल यांनी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता श्री. राठौर आणि कार्यकारी अभियंता जैन यांची भेट घेऊन कामांचा आढावा घेतला. या दरम्यान त्यांनी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही फोनवर चर्चा करून कामांना गती देण्याचे निर्देश दिले. ऊझऊउ मधील निधीअभावी अडलेल्या कामांना गती देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेशही दिले. आमदार अग्रवाल म्हणाले, मुंडीपार येथील १३२ केव्हीच्या एकत वर मोठा भार आहे. हा भार कमी करण्यासाठी एका नवीन १३२ केव्ही सबस्टेशनच्या उभारणीसाठी प्रयत्न सुरू असून लवकरच त्यात सफलता मिळेल. ज्या भागात २५ किंवा ७५ घतअ चे ट्रान्सफॉर्मर आहेत, त्यांना १०० घतअ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी हिवरा आणि झिलमिली उपकेंद्रांमध्ये १० चतअ चे उच्चस्तरीय ट्रान्सफॉर्मर बसवून या कामाची सुरुवात झाली आहे. आगामी काळात गोंदिया राज्यातील सर्वात सक्षम आणि सज्ज वीजव्यवस्था असलेला जिल्हा बनवणे हाच आमचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *