विद्यार्थ्यांच्या शारीरिक व कलात्मक विकासासाठी सांस्कृतिक महोत्सव अत्यंत प्रेरणादायी- विभागीय अध्यक्ष डॉ. शिवलिंग पटवे

दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदूर:- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे कला पाहण्याचा योग आला. आणि प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक व सांघिक, वैयक्तिक नेत्रदिपक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केलेले आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये उपजत कलागुण असतात.

या कलेचे प्रदर्शन करण्याकरिता त्यांना व्यासपीठ हवे असते आणि तो व्यासपीठ जिल्हा परिषद, भंडारा द्वारे शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांना मिळतो म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शारीरिक व कलात्मक विकासासाठी सांस्कृतिक महोत्सव अत्यंत प्रेरणादायी आणि महत्त्वाचा आहे. असे प्रतिपादन डॉक्टर शिवलिंग पटवे, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नागपूर यांनी उद्घाटनाप्रसंगी कोच्छी ता. लाखांदूर येथे केले.

तीन दिवसीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव जिल्हा परिषद भंडाराच्या वतीने जि प उच्च प्राथमिक शाळा, कोच्छी येथील भव्य पटांगणावर अतिशय सुंदर, रमणीय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सर्व विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष जि. प. सदस्य प्रियंक बोरकर, बक्षीस वितरक डॉ. शिवलिंग पटवे, प्रमुख अतिथी जि. प. शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर, शिक्षण समिती सदस्य मोहन पंचभाई, उमेश नंदागवळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), शिक्षण समिती सदस्य संदिप ताले, लता नरुले, दिलीप सार्वे, रमेश पारधी, सर्व जि. प. सदस्य, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपस्थित मान्यवरांनी सदर कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन केले. यशस्वी क्रीडा महोत्सव आयोजनाबाबत सर्व कोच्छी वासीयांचे अभिनंदन जेवढे करावे तेवढे कमीच आहे. असे प्रतिपादन नरेश ईश्वरकर, सभापती, शिक्षण व बांधकाम यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर क्रीडा महोत्सवात हिरिरीने सहकार्य करणाऱ्या शाळाप्रेमी ग्रामस्थांचा शाळेतर्फे पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे दप्तर समिती, प्रसिद्धी समिती, पंच यांचे सुद्धा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र, पदके देऊन गौरविण्यात आले. या शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवामध्ये विजेत्या शाळा खालील प्रमाणे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *