ठाकचंद मुंगुसमारे याचा भाजपात प्रवेश
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- माजी पालकमंत्री तथा विधान परिषद सदस्य डॉ. परीणय फुके यांच्या नेतृत्वाखाली दि. नाकाडोंगरी को-ऑप. राईस मिलचे अध्यक्ष तथा लोभीचे माजी सरपंच ठाकचंद मुंगुसमारे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी अजय गहाणे (सामाजिक कार्यकर्ता), अनिल गौपाले (उपसरपंच, ग्रा. पं. आष्टी), संतोष पुष्पतोडे (सामाजिक कार्यकर्ता), ऋषीकुमार गौपाले (सामाजिक कार्यकर्ता), रोहित मिचर्ुले, अभिमन्यू ठाकरे, यश कोल्ते, वैभव देशमुख तसेच मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रवेशामुळे परिसरातील राजकीय व सामाजिक चळवळीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.









