अधिवेशन संपेपर्यंत खा. डॉ. प्रशांत पडोळे यांच्यासह काँगे्रसच्या ८ खासदारांचे निलंबन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- लोकसभेच्या कामकाजा दरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलण्यापासून रोखण्यात आल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या खासदारांनी आक्रमक आंदोलन छेडले. आंदोलना दरम्यान अध्यक्षांच्या दिशेने कागद फेकले. याचा ठपका ठेवत भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्यासह काँग्रेसच्या आठ खासदारांना संसदेच्या उर्वरित कामकाजातून निलंबित करण्यात आले.

या निलंबनानंतर खा. डॉ. पडोळे यांनी केंद्र सरकारविरोधात तीव्र आणि संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. निलंबीत करण्यात आलेल्या खासदारात पडोळे यांच्यासह अमरिंर्दर सिंह, राजा वडिंग, एस. वेंकटचलम, मणिकम टागोर, किरणकुमार रेड्डी, हिबी इडेन, गुरुजीत औजला व डीन कोरियाकोझ यांचा समावेश आहे. खा. डॉ. प्रशांत पडोळे म्हणाले की, संसद ही सर्वसामान्य जनतेचा आवाज असलेली सर्वोच्च लोकशाही संस्था आहे. मात्र आज त्याच संसदेत सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. देशाची सुरक्षा, महागाई, बेरोजगारी, शेतकरी, आदिवासी, दलित आणि सर्वसामान्य नागरिकांचे ज्वलंत प्रश्न मांडले की सत्ताधारी पक्ष मुद्दाम गोंधळाची परिस्थिती निर्माण करतो. ते पुढे म्हणाले, जनतेचे प्रश्न मांडणे हे माझे कर्तव्य आहे. त्या कर्तव्याची शिक्षा म्हणून माझ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पण स्पष्ट सांगतो ड्ढ जनतेच्या हक्कासाठी माझे निलंबन झाले तरी चालेल.

निलंबनासच काय, मला फासावर चढवले तरी मी फासावर चढायला तयार आहे. सत्ताधारी पक्ष बहुमताचा गैरवापर करून लोकशाहीची गळचेपी करत असल्याचा आरोप करत खा. डॉ. पडोळे म्हणाले की, ङ्गहा लढा एखाद्या खासदाराचा नाही, तर देशातील कोट्यवधी जनतेच्या हक्कांचा आहे. विरोधकांना बोलू दिले जात नसेल, तर संसद केवळ शिक्कामोर्तब करणारी संस्था बनून राहील. लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जनतेच्या अधिकारांसाठी काँग्रेस पक्षाचा संघर्ष अधिक तीव्र होईल, असे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, संसदेत असो वा रस्त्यावर, जनतेच्या प्रश्नांसाठी माझा आवाज कधीही थांबणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *