बंद पडलेली धान खरेदी तात्काळ सुरु करून शेतकऱ्यांचे देयके द्या- मोहन पंचभाइ

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे जिल्हाधिकारी निवेदन देण्यात आले. भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. मार्केटिंग फेडरेशनमार्फत विविध खरेदी केंद्रांवर २२ नोव्हेंबरपासून धान खरेदी सुरू करण्यात आली होती. मात्र सध्या अचानक कारणे सांगून धान खरेदी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांना अद्याप मागील हंगामातील धानाचे पैसे वेळेत मिळालेले नाहीत. त्यातच नवीन हंगामासाठी लागणारा खर्च, लागवड, बियाणे, खत, औषधे,घरखर्च तसेच बँक कर्जाची परतफेड यामुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना बोनस देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

मात्र अद्याप त्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. तरी शासनाने बंद पडलेली धान खरेदी तात्काळ सुरू करावी, प्रलंबित देयके त्वरीत अदा करावीत तसेच जाहीर केलेला धान बोनस त्वरित देण्यात यावा. अन्यथा काँग्रेसपक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष मोहनभाऊ पंचभाई, महिला जिल्हाध्यक्ष सौ जयश्री ताई बोरकर, जय डोंगरे, भंडारा तालुका अध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, मोहाडी तालुका अध्यक्ष राजेश हटवार, शहर अध्यक्ष धनराज साठवणे, नगरसेवक गजानन बादशाह, रिजवान काजी, गजानन झंझाड, नरेंद्र साकुरे, मनोज बागडे, जीवन कावळे, तुळसीराम बिलवणे, हंसराज गजभिये, भजनलाल चौरे, भगवान राऊत, पृथ्वीभाऊ तांडेकर, रुपचंद नागपुरे, फारुख शेख व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *