आजपासून कोच्छी येथे जिल्हास्तरीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- जिल्हा परिषद, भंडारा अंतर्गत शिक्षण विभाग (प्राथमिक) च्या वतीने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव दि. ३१ जानेवारी, ०१ व ०२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कोच्छी ता. लाखांदूर जि. भंडारा येथील भव्य पटांगणावर आयोजित करण्यात आला आहे. सदर महोत्सवाचे उद्घाटन शनिवार, दि. ३१ जानेवारी २०२६ ला पालकमंत्री ना. पंकज भोयर यांचे हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी आमदार नाना पटोले राहणार आहेत.

विशेष अतिथी खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार डॉ. प्रशांत पडोळे, आ.डॉ. परिणय फुके, आ. अभिजीत वंजारी, आ. सुधाकर अडबाले, आ. नरेंद्र भोंडेकर, आ. राजू कारेमोरे, जि. प. अध्यक्ष कविता र्उईके, जिल्हाधिकारी सावन कुमार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे, पोलीस अधीक्षक नूरुल हसन, जि. प. उपाध्यक्ष एकनाथ फेंडर, शिक्षण व बांधकाम सभापती तथा स्वागताध्यक्ष नरेश ईश्वरकर, सभापती आनंद मलेवार, सभापती शीतल राऊत, सभापती अनिता नलगोपुलवार, अजित पवार सोशल फाऊंडेशनचे राज्य अध्यक्ष पंकज तंतरपाळे, कोच्छीच्या सरपंचा सुरेखा देसाई, उपसरपंच मुरलीधर वावरे, सह स्वागताध्यक्ष प्रियंका बोरकर, जि. प. सदस्य तसेच सर्व जि. प. सदस्य, जिल्हा परिषद, सर्व पंचायत समिती सभापती, उपसभापती यांच्या प्रमुखउपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.

प्राथमिक गटाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन जि. प. उपाध्यक्ष एकनाथ फेंडर, यांचे हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी सभापती आनंद मलेवार व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी दि. ०१ फेब्रुवारीला उच्च प्राथमिक गटाचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन शितल राऊत, सभापती, समाजकल्याण, यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी अनिता नलगोपूरलवार, सभापती, महिला व बालकल्याण ह्या असणार आहेत. तसेच सर्व जिल्हा परिषद सदस्या, सरपंच, ग्राम पंचायत, कोच्छी ह्या उपस्थित राहणार आहेत. दि. ०२ फेब्रुवारीला सदर क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे बक्षीस वितरण दुपारी ०४.०० वाजता आ. नाना पटोले यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष कविता उईके ह्या असणार आहेत.

विशेष अतिथी सावन कुमार जिल्हाधिकारी, मिलिंदकुमार साळवे मुख्य कार्यकारी अधिकारी, नुरुल हसन पोलीस अधीक्षक, डॉ. शिवलिंग पटवेअध्यक्ष विभागीय मंडळ, नागपूर, माधुरी सावरकर उपसंचालक नागपूर, राजेश रुद्रकार प्राचार्य डाएट भंडारा, निलेश कदम उपविभागीय अधिकारी साकोली, शिवम विसापुरे उपविभागीय पोलीस अधिकारी साकोली, प्रमोदकुमार पवार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, विवेक बोंद्रे प्रकल्प संचालक, संजय जोल्हे उपमुख्यकार्यकारी अधिकारी (सा. प्र), उमेश नंदागवळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), माणिक चव्हाण प्रकल्प संचालक जल जीवन मिशन, संदिप बोरकर मुख्य लेखा व वित्त अधिकारी, डॉ. मिलिंद सोमकुवर जिल्हा आरोग्य अधिकारी, लतिका लेकुरवाळे, वैभव पवार तहसीलदार लाखांदूर, सचिन पवार पोलीस निरीक्षक लाखांदूर तसेच सर्व गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाला गावकरी, शिक्षक वर्ग, विद्यार्थी वर्ग तथा पालक वर्ग यांनी सहकार्य करावे व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल, यासाठी प्रोत्साहन द्यावे. असे आवाहन स्वागताध्यक्ष तथा सभापती नरेश ईश्वरकर, सह स्वागताध्यक्ष जि. प. सदस्य प्रियंक बोरकर, रवींद्र सोनटक्के शिक्षणाधिकारी (प्राथमिक), मनीषा गजभिये शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *