“दादा’ च्या निधनानंतर अनेकांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्यासह राज्याच्या मंत्रीमंडळातील सदस, सत्ताधारी व विरोधी पक्षाचे नेते, खासदार, आमदार, पक्षाचे पदाधिकारी यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. अजित पवार यांच्या निधनामुळे भंडारा जिल्ह्यातील अनेकांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. भारतीय जनता पार्टी भंडारा जिल्हा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांच्यावतीने आज त्यांच्या कार्यालयात अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *