भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रध्दांजली

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- दि. २८ जाने. ०२६ ला भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रध्दांजली. बारामती येथील विमान दुर्घटनेत राज्यातील लोकप्रिय जननेता स्व. अजितदादा पवार यांचे दुःखद निधन झाले.

जनसेवेचा वसा, कणखर नेतृत्व व प्रशासनावर जबर पकड असलेले, सर्वसामान्य जनतेचे लाडके नेतृत्व, लोकप्रिय जननेता स्व. अजितदादा पवार यांचे दुःखद निधन झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारासह संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसाठी काळा दिवस ठरला आहे. त्यांच्या चरणी श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या प्रतिमेला पुष्पवाहून अश्रुपुर्ण व भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करीत ईश्वर मृतात्म आत्म्याला शांती देवो अशी प्रार्थना उपस्थितांनी केली.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष, नानाभाऊ पंचबुध्दे, आमदार राजुभाऊ कारेमोरे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, प्रा. माधुरी पालीवाल, योगेश हेडाऊ, हेमंत महाकाळकर, शेखर (बाळाभाऊ) गभने, डॉ. जगदिश निंबार्ते, डॉ. रविंद्र वानखेडे, डॉ. श्रीकांत वैरागडे, यशवंत सोनकुसरे आरजु मेश्राम, हितेश सेलोकर, सुमित शामकुंवर, राजु पटेल, डॉ. सचिन बावनकर, सदाशिव ढेंगे, महेंद्र वाहाने, मंजुषा बुरडे, सुषमा साखरकर, किर्ती गणविर, लोकेश खोब्रागडे, नारायणसिंग राजपूत, आनंद मलेवार, रजनिश बन्सोड, उत्तम कळपते, दयानंद नखाते, सौ. रत्नमाला चेटूले, ॲड. नेहा शेंडे, डॉ. अनिता महाजन, मनिष वासनिक, रुपेश टांगले, चंद्रकांत कोहाड, अरुण भेदे, कपील जैन, अमन मेश्राम, सुनिता उपरिकर, हर्षिला कराडे, छाया गभणे, निशा राऊत, वंदना तुरस्कर, राजश्री राखडे, किर्ती कुंभरे, सारिका नागदेवे, क्रिष्णा उपरीकर, ईश्वर कळंबे, राजु बावनकुळे, राजु शक्तीकर, राजेंद्र राखडे, संजय सतदेवे, सुनिल मोगरे, अरुण अंबादे, साहिल हुमणे, लोकेश नगरे, भोजराज वाघमारे, प्रेमसागर गजभिये, फरहान पटेल, विशाल बावनकुळे, अज्ञान राघोर्ते, राजु लुटे, रुपेश खवास, सुभाष तितीरमारे, निरज शहारे, प्रदीप सुखदेवे, सुनिल भोपे, रवि लक्षणे, किरण पवनकर, सुरेश थोटे, विष्णु कढीखाये, रविंद्र पवनकर, राजेश वासनिक, विद्या साखरे, नरेंद्र साखरकर, सुधिर वहिले, अबरार अहमद, प्रकाश भुरे, लक्ष्मीकांत गभणे, व फार मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *