मराठी भाषा पंधरवाडा निमीत्त पुस्तक वितरण

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्हा ग्रंथालय अधिकारी व सार्वजनिक वाचनालय भंडारा यांच्या संयुक्त्त विद्यमाने मराठी भाषा पंधरवाडा निमीत्त पुस्तक वितरण करण्यात आले. यावेळी मंचावर उपस्थितांमध्ये आ. नरेंद्र भोंडेकर, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष धनंजय दलाल, जिल्हा ग्रंथालय अधिकारी खोमेंद्र बोपचे, वाचनालयाचे कार्यवाह प्रा. सुमंत देशपांडे उपस्थित होते.

याप्रसंगी भंडारा विधानसभेचे आ. .भोंडेकर यांच्या स्थानिक विकास निधीतुन सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात प्राप्त निधीतुन १८ लाख रूपये किमतीच्या स्पर्धा परीक्षाच्या पुस्तके सार्वजनिक वाचनालय भंडारा या संस्थेस प्राप्त झाले. यावेळी भंडारा जिल्ह्यातील ५९ ग्रंथालयांना पुस्तके वितरण करण्यात आली. या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थितांमध्ये डॉ. प्रकाश मालगावे, हर्षल मेश्राम, निलकंठराव रणदिवे, नारनवरे व जिल्ह्यातील ग्रंथालयाचे कार्यवाह व ग्रंथपाल उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *