खडकी येथे अंगणवाडीतील मुलामुलींना गणवेश वाटप
दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- खडकी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चार अंंगणवाडीतील ७० मुला मुलींना गणवेश चे वाटप सरपंच अश्विन बागडे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच बाबु ठवकर, ग्रामपंचायत अधिकारी अक्षय शेळके, पोलीस पाटील महेंद्र लाडे, अंगणवाडी सेविका शालु वनवे, सविता इलमकर, जयश्री लाडे, मदतनीस लक्ष्मी वाढवे, ग्रामपंचायत कर्मचारी मनोहर धांडे व अन्य उपस्थित होते. अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत निधी अंतर्गत गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी बालकांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आले









