२६ जानेवारी रोजी लक्ष्मी ऍग्रो एजन्सी मध्ये तिरंगा रंगाचे ट्रॅक्टरचे सादरीकरण व माजी सैनिकांचा सत्कार

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी १०.०० वाजता लक्ष्मी ॲग्रो एजन्सी भंडारा येथे तिरंगा रंगाचे ट्रॅक्टरचे सादरीकरण व माजी सैनिकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीकडून तिरंगा रंगाचे ५८५ युवो टेक प्लस ४ डब्लूडी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले आहे. त्याचे सादरीकरण २६ जानेवारी रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. तसेच भंडाऱ्यातील माजी सैनिक यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिंद्रा कंपनीचे स्टेट हेड डि. सी. कदम हे राहणार आहेत. शेतकरी व माजी सैनिकांनी उपस्थित राहावे अशी विनंती लक्ष्मी ॲग्रो एजन्सीचे संचालक विजय एच. पारधी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *