तुमसर नगरपरिषदेतील नामनिर्देशित सदस्यांचा वाद राज्य सरकारपर्यंत

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर नगरपरिषदेच्या राजकीय आणि प्रशासकीय वतुर्ळात सध्या मोठी खळबळ उडाली आहे.

एकीकडे विषय समित्यांच्या निवडीसाठी निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच, दुसरीकडे प्रशासकीय सोयीसाठी मुख्याधिकारी पदाच्या जबाबदारीत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. आगामी निर्णयप्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे “ॲक्शन मोड’मध्ये असल्याचे चित्र आहे.

तुमसर नगरपरिषदेच्या १६ जानेवारी रोजी झालेल्या पहिल्यासर्वसाधारण सभेत करण्यात नामनिर्देशित आलेल्या सदस्यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी यांनी थेट नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे सविस्तर अहवाल सादर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *