भंडारा शहरात ट्रॅफिक पोलिसांच्या कारवाईविरोधात नागरिकांचा संताप
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शहरातील मीस्किन टँक गार्डन ते राजीव गांधी चौक या अतिशय वदर्ळीच्या रस्त्यावर सध्या अंडरग्राउंड नालीचे काम सुरू आहे. या मार्गावर आज दुपारी सुमारे एक वाजेपासून कोणतेही ट्रॅफिक डायवर्जन न करता जेसीबी मशीनद्वारे रस्त्याचे काम सुरू होते. दोन्ही बाजूंनी वाहनांची ये-जा सुरू असताना ड्युटीवर असलेल्या ट्रॅफिक पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याऐवजी आपल्या डाव्या बाजूने नियमानुसार राजीव गांधी चौकाकडे जाणाऱ्या दुचाकीस्वारांना पुढे जाऊन अडवले व त्यांचे फोटो काढत चालन केले.
चालकांनी आम्ही चुकीच्या बाजूने नसताना चालन का केले जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला असता संबंधित कॉन्स्टेबलने उद्धटपणे मला करायचे आहे, ज्याला सांगायचे आहे त्याला सांगा असे उत्तर दिल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, प्रत्यक्षात विरुद्ध बाजुने येणाऱ्या वाहनांवर कोणतीही कारवाई न करता योग्य बाजूने जाणाऱ्या नागरिकांनाच लक्ष्य करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. आधीच रस्त्यावरील कामामुळे त्रस्त असलेल्या भंडाऱ्याच्या नागरिकांना अशा प्रकारे अधिक त्रास देणे चुकीचे असून या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी व चुकीची चालाने तात्काळ रद्द करावीत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.







