उभ्या ट्रकला स्कुटी चालकाची धडक; तरुणाचा मृत्यू
भंडारा:- रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला स्कूटीची धडक झाली. यात ३० वर्षीय तरुणाचा जागीच अंत झाला. मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर कारधा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या धारगाव गावाजवळ २० जानेवारीला सकाळी ५:४५ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. संकेत सुखदेव सपाटे (वय ३०, हनुमान नगर, लाखनी) असे मृत तरूणाचे नाव आहे. माहितीनुसार, संकेत हा भंडाराहून लाखनीला त्याच्या स्कूटीने (क्रमांक एमएच ३६ एएम ४५०६ ने) जात होता.
धारगावजवळ पोहचताच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकच्या (क्रमांक सीजी ०४ एमबी ७६९६) मागच्या बाजूला त्याची स्कूटी धडकली. धडक इतकी जोरदार होती की, संकेतच्या डोक्याला गंभीर – दुखापत झाली. स्कूटीचेही मोठे नुकसान झाले. कारधा टी-पॉइंटवरून जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थानची रुग्णवाहिका घटनास्थळी आली. तसेच कारधा. पोलिस ठाण्यातही अपघाताची देण्यात माहिती आली. घटनास्थळी पोलिस हवालदार विनय साठवणे, पोलिस नाईक मार्कड डोरले यांनी घटनास्थळी धाव घेतली. संकेतला तातडीने भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कारधा पोलिस तपास करत आहेत.







