झेडपीच्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या उपदानासाठी ८२ कोटी ७४ लाखाची मागणी
दै. लोकजन वृत्तसेवा सिल्ली /अंबाडी :- झेडपीच्या शाळेतून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या उपदान/ अंशराशींकरणासाठी ८२ कोटी ७४ लक्ष ५४ हजार १३३ रुपयाची गरज असून निधीची मागणी करण्यात आली आहे. निधी प्राप्त झाल्यावर सेवानिवृत्त शिक्षकांचे आर्थिक लाभ देण्याचे शिक्षणाधिकारी यांनी मान्य केले. यावेळी निधीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचे आमदार अडबाले यांनी आश्वासन दिलें.
जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रलंबित समस्या बाबत सोमवारी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी जिल्हा परिषद समिती कक्षात सभेचे आयोजन करण्यात आले. केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षण विस्तार अधिकारीइत्यादी पदोन्नतीची तसेच सेवानिवृत्त शिक्षकांच्या अंशराशींकारण प्रकरणे मार्गी लावणे, कार्यरत तसेच सेवानिवृत्त शिक्षकांना दरमहा ७ तारखेच्या आत वेतन/पेन्शन खात्यावर जमा करावे इत्यादी विषयावर सकारात्मक चर्चा झाली.
प्राथमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के, उपशिक्षणाधिकारी राहुल बावा, माध्यमिक शिक्षणाधिकारी मनिषा गजभिये, अधीक्षक मनिष वाहाणे, वेतन पथक अधीक्षक प्रभा दुपारे, भाऊसाहेब मुंडे, लेखाधिकारी स्वाती ईश्वरकर, प्रशासन अधिकारी प्रशांत मिश्रा, सुनिल पंचबुधे, विमाशिचे सुधाकर देशमुख, राजेश धुर्वे, विठ्ठल जुनघरी, पुरुषोत्तम लांजेवार, धीरज बांते, टेकचंद मारबते, अनंत जायभाये, प्रभाकर मेश्राम, दारासिंग चव्हाण, प्रा. सोनकुसारे, संजय पडोळे,भाऊराव वंजारी, नरेंद्र पडोळे, चंद्रशेखर रहांगडाले, रुपेश नागलवाडे, सुधाकर धाडसे, जागेश्वर मेश्राम, शालिकराम खोब्रागडे, गौतम खोब्रागडे, मार्तंड गायधने, रोहित मरस्कोल्हे, प्रकाश मते, प्रमोद सेलोकर, श्रीधर खेडीकर, हर्षल कोट्टेवार, महेंद्र बडवाईक इत्यादीं सभेला उपस्थित होते.







