गोंदिया जिल्ह्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

गोंदिया:- सडक अजर्ुनी तालुक्यातील डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोहमारा चौक परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवार १९ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली.

मृतकाचे नाव हर्षल केशव अग्रवाल (रा. कोहमारा) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हर्षल अग्रवाल हे कोहमारा चौक येथे रस्त्याच्या पलीकडील चहा टपरीकडे पायी जात असताना मुख्य रस्ता ओलांडून कमल परसोडकर यांच्या घरासमोर उभे होते. त्याच वेळी देवरीकडून साकोलीकडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहन चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवून त्यांना जोरदार धडक दिली.

या अपघातात हर्षल अग्रवाल गंभीर जखमी झाले असून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून तसेच डॉक्टरांच्या लेखी मेमोवरून डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा भारतीय दंड संहिता कलम २७९, ३०४ (अ) तसेच बी.एन.एस. २०२३ कलम २८१, १०६(१) व मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवा. कठाणे (ब.नं. १५१०) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून अज्ञात वाहन चालकाचा शोध सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *