शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले ऑन द स्पॉट आदेश
दै. लोकजन वृत्तसेवा सिल्ली /अंबाडी :- समस्या तुमच्या, पुढाकार आमचा, या उपक्रमात शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांची १९ जानेवारी रोजी आढावा बैठक घेतली. यात ०२ नियमित मुख्याध्यापक, ०१ वरिष्ठ श्रेणी आणि ०१ शिक्षण सेवक ते नियमित शिक्षक अशा चार प्रकरणाना सभेतच ऑन द स्पॉट मंजूरी प्रदान करण्यात आली.
यांना दिलें ऑन द स्पॉट आदेश :- भागीरथा भास्कर हायस्कूल भंडाराचे मुख्याध्यापक दादाराम लुचे, सरस्वती विद्यालय खापा /तुमसरचे मुख्याध्यापक नरेश मारबते, नगर परिषद कस्तुरबा गांधी विद्यालय तुमसर येथील शिक्षक नरेंद्र पडोळे यांना २३ जून २००३ ते २२ जून २००६ शिक्षण सेवक व दि. १८ ऑगस्ट २००६ पासून नियमित शिक्षक मान्यता, शिव छत्रपती प्राथ. शाळा तुमसर येथील शिक्षक हिरालाल ढोणे यांचे वरिष्ठ श्रेणी प्रकरण मंजूर झाले.
याशिवाय गांधी विद्यालय शिक्षण संस्थेतील ९ शिक्षकांचे सेवासातत्या मंजूर झाले. विश्वनाथ पचारे यांचे सेवा निवृत्ती प्रकरण मंजुरी साठी सादर केले. न्यायालयीन प्रकरणातील सेवा निवृत्त शिक्षकांची प्रोव्हीजनल पेन्शन तिमाही न देता दरमाह द्यावी. विवेक हातझाडे यांची अहर्ता पूर्ण होईपर्यंत मानधन सुरु ठेवण्यात येईल. विनोद विद्यालय गोसे येथील शिक्षकांची थकबाकी देण्याचे ठरले. शाळांची मान्यता वर्दीत संपन्यापूर्वी प्रस्ताव सादर करावे, शालार्थ आयडीची प्रकरणी हमीपत्र न देणाऱ्या शाळेची सुनावणी घ्यावी.अनुकंपा नियुक्ती प्रकरणी खाजगी शाळा सेवाशर्ती १९८१ नियम ९/४ ब नुसार मान्यता द्यावी. मुख्याध्यापक पद मंजूर नसलेल्या शाळेत पुढील आदेशापर्यंत मान्यता देणे, नूतन कन्या शाळेतील शिक्षकांचे वरिष्ठ श्रेणी थकबाकी अदा करावी. शुक्रचार्य विद्यालयातील शिक्षकांचे वेतनवाढ तसेच जिएफपी खातेबाबत शिक्षणाधिकारी स्वतः वस्तूनिष्ठ तपासणी करतील. नानाजी जोशी विद्यालय शहापूर येथील मुख्याध्यापक मान्यता प्रकरणी १५ फेब्रुवारी पर्यंत निर्णय देण्यात येईल. भारत राठोड व सुनिल वाघमारे या सेनि. शिक्षकांची महागाई थकबाकी अदा करावी.
सेनि. शिक्षिका भारती सोनटक्के यांची निवडश्रेणी मंजूर करावी. वेतन खात्यावर जमा झाल्यानंतर लगेच व्हाऊचर नंबर द्यावे. खाजगी प्राथ. शिक्षक :डीसीपीएस धारक सेवानिवृत्त शिक्षकांचे ग्रॅज्युएटी प्रस्ताव सादर करण्याचे मुख्याध्यापकांना पत्र द्यावे. पवित्र पोर्टल शिक्षक सेवापुस्तके तसेच दुय्यम सेवापुस्तकासाठी कॅम्प घ्यावे. ममता पूर्व माध्य. शाळा येरली येथील शिक्षकांच्या शालार्थ आयडी प्रणालीतील जन्मनोंद दुरुस्ती प्रस्ताव मंजूर करणे, विठोबा कावळे यांचे निवड श्रेणी शासन निर्णय ६ मार्च २००६ नुसार शिक्षणाधिकारी यांनी मंजूर करावे, थकीत देयके चेकलिस्ट नुसार घ्यावे. डीसीपीएसची रक्कम जीपीएफ खात्यामध्ये समाविष्ट करण्याचे प्रस्ताव दिलें, चालू थकीत देयके ०४ व जुनी ५५ आहेत.
सभेला विमाशिचे आमदार सुधाकर अडबाले, विठ्ठल जुनघरी, सुधाकर देशमुख, राजेश धुर्वे, पुरुषोत्तम लांजेवार, धीरज बांते, टेकचंद मारबते, अनंत जायभाये, प्रभाकर मेश्राम, दारासिंग चव्हाण, प्रा. सोनकुसारे, संजय पडोळे, भाऊराव वंजारी, नरेंद्र पडोळे, चंद्रशेखर रहांगडाले, रुपेश नागलवाडे, सुधाकर धाडसे, जागेश्वर मेश्राम, शालिकराम खोब्रागडे, गौतम खोब्रागडे, मार्तंड गायधने, रोहित मरस्कोल्हे, प्रकाश मते, हर्षल कोट्टेवार, महेंद्र बडवाईक इत्यादींनी सभेला उपस्थित होते. शिक्षण विभागाचे प्राथमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के, उपशिक्षणाधिकारी राहुल बावा, माध्यमिक शिक्षणाधिकारी मनिषा गजभिये, अधीक्षक मनिष वाहाणे, वेतन पथक अधीक्षक प्रभा दुपारे, भाऊसाहेब मुंडे, लेखाधिकारी स्वाती ईश्वरकर, प्रशासन अधिकारी प्रशांत मिश्रा, सुनिल पंचबुधे इत्यादी.









