भंडारा नगरपरिषदेची अतिक्रमणविरोधी धडक कारवाइ
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा नगरपरिषदेच्या वतीने शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व सार्वजनिक रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याच्या उद्देशाने दुसऱ्या टप्प्यात गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोरी त्रिमुर्ती चौक या मुख्य मार्गावरचे अतिक्रमण आज काढण्यात आले.
नगरपरिषद मार्फत १०० दिवसांचा विशेष कृती आराखडाची अंमलबजावणी सुरू असून त्यामध्ये प्राथमिकता शहरातील असलेल्या अतिक्रमण मुक्त करण्यासाठी कार्यवाही नगरपरिषद मार्फत सुरू आहे. या अगोदर खात रोडवरील अतिक्रमण काढण्यात आले.शहरातील दुकानदारांना अतिक्रमण काढण्याबाबतचे आवाहन नगरपरिषद मार्फत वेळोवेळी करण्यात येते. परंतु, अतिक्रमण स्वतः दुकानदार काढत नाहीत. उलट रस्त्यावर आपले सामान ठेवतात. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
नेहमीच या रस्त्यावर वाहतुकीचा प्रश्न उपस्थित होतो. अतिक्रमण काढण्याचे नोटीस काढूनही दखल घेतली जात नाही. यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मार्गावरील रहदारीस अडथळा करणारे अतिक्रमण आज दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी काढण्याची मोहिम आज राबविण्यात आली. नगर परिषद व पोलीस प्रशासनाने संयुक्तिक कार्यवाही करत ६० ते ७० अतिक्रमणधारकांवर बुलडोजर चालून अतिक्रमण मुक्त करण्यात आले आहे.
या कारवाईत गांधी चौक ते पोष्ट ऑफिस चौक, बसस्थॉनक ते त्रिमूर्ती चोक या रस्त्यावर अनधिकृतपणे उभारण्यात आलेले बांबूचे कच्चे दुकाने, टिनाचे शेड, सिमेंटरचे रपटे, हातगाडे, टपऱ्या, फलक तसेच दुकानांसमोरील अडथळे हटविण्यात आले. अतिक्रमणामुळे या मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत असून पादचाऱ्यांना चालणेही अवघड होत होते. नगरपरिषद प्रशासनाने यापूर्वी संबंधित व्यावसायिकांना सूचना व नोटिसा दिल्या होत्या. त्यानंतरही अतिक्रमण कायम असल्याने आज प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्या मार्गदर्शानाखाली पवन कनोजे, संकेत कोचे, मिथुनमेश्राम, सनी सोनेकर, पवन मोगरे, अंकुश हुमणे, आकाश मेश्राम, सागर रगडे, अरविंद गणवीर, ४ फायरमन व चांताराम तिबोडे व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.









