एमआरईजीएसच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार!निकृष्ट दर्ज्याच्या कामांची चौकशी !
गोंदिया :- देवरी पंचायत समिती अंतर्गत एम.आर.ईजी. एस.च्या कामात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देवरी शहरातील सामाजिक कार्यकर्ता व एडवोकेट भूषण मस्करे यांनी केला होता, या संदर्भात भूषण मस्करे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आणि जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी यांना पत्र व्यवहार करीत झालेल्या कामांची चौकशी करण्याची विनंती केली असता स्वतः जिलाधिकारी प्रजीत नायर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकरी एम. मुरुगनंथम यांना समिती गठीत करून चौकशी करण्याचे आदेश दिले असता बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश ताकसांडे आणि इतर दोन अधिकारी हे देवरी तालुक्यातील मुल्ला आणि वडेगाव या दोन ग्रामपंचायती अंतर्गत झालेल्या कामांच्याचौकशी करिता आले.
मात्र खरे मात्र मुल्ला गावातील एकाच कामाची पाहणी करून वडेगाव ग्रामपंचायतीच्या कामांची चौकशी न करता मिटींग असल्याचे कारण दाखवीत निघून गेले मात्र जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यानी नेमून दिलेली चौकशी समिती हि एका खाजगी वाहनाने मल्ला गावात आल्याने गावकऱ्यांना देखील संभ्रम पडला त्यामुळे चौकशी समिती दौऱ्यावर आली असताना वाहन भत्ता कोणत्या वाहनाचा दाखविणार असा प्रश्न तक्रार करते याना देखील पडला आहे.
तर विशेष बाब म्हणजे मुल्ला गावात १२ किलोमीटर चा खडीकरण रस्ता आणि ८ पाईप पूल तयार करण्यासाठी जवळपास ३ कोटी रुपयाचे बिल काढण्यात आले मात्र प्रत्यक्षात ४ किलोमीटर चा रस्ता आणि ४ पाईप पूल तयार करण्यात आले आहे तर विशेषबाब म्हणजे देवरी पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता धवल सोमलवार हे ४ महिन्याच्या सुट्टीवर असताना त्याच काळात त्यांची बोगस स्वाक्षरी मारून हे बिल उचलण्यात आल्याचे निदर्शनात आले आहे, त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभाग खरंच चौकशी करून दोषी लोकांवर कार्यवाही करणार काय या कडे सर्वांचे लक्ष आहे.
या संदर्भात चौकशी समितीला माध्यमांच्या प्रतिनिधीनि विचारणा केली असता तुम्ही चौकशी समितीचे व्हिडीओ फोटो काढू शकत नाही आणि आम्ही तुम्हाला काही माहिती देऊ शकत नाही अशी माहिती चौकशी समितीने दिली मात्र शाखा अभियंता धवल सोमलवार यांनी मी त्या काळात४ महिन्याच्या रजेवर असल्याची माहिती चौकशी समितीला दिली आणि बिलांवर माझी खोटी स्वाक्षरी मारून बिल उचलले असल्याचे त्यांनी चौकशी समितीला सांगितले आहे.
त्यामुळे देवरी पंचायत समितीचे शाखा अभियंता हे चार महिन्याच्या सुट्टीवर असताना देवरी पंचायत समितीचे सभापती यांच्या संगनमताने देवरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात खोटी बिले सादर करून कोट्यवधी रुपयाचे बिल उचल केली असल्याचे निदर्शनास आले असून या संदर्भात योग्य चौकशी केल्यास अनेक दोषी अधिकाऱ्यांचे नावे समोर येतील आणि देवरी पंचायत समितीचे तत्कालीन गट विकास अधिकारी आणि सभापती यांच्यावर काय कार्यवाही होते हे चौकशी समितीच्या अहवालानंतरच कळणार आहे.









