बिरसा मुंडा चौक व शासकीय तंत्रनिकेतन परिसरात बिबट्याची दहशत
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- मागील आठवड्या पासून शेंदुर्वाफा येथील बिरसा मुंडा चौक व शासकीय तंत्रनिकेतन परिसरात बिबट्याच्या वावर वाढल्यामुळे स्थानिकांत भीतीचे वातावरण असून नागरिकांकडून एकट्या दुखट्याने रात्री अपरात्री बाहेर फिरण्याचे टाळले जात आहे तर काही युवा वर्गांकडून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सोबत गस्त सुद्धा करण्यात येत आहे.
मागील काही दिवसांपासून शहरातील प्रभाग क्र. १ व २ मध्ये जनतेनी बिबट्याला परीसरात मुक्त संचार करतांना बघीतले. शनिवार ता. १७ जानेवारीला नागरीकांना बिबट्या वाघाचीपायांची ठसे आढळली आहेत. या परीसरात जनतेने सायंकाळी नंतर लहान मुलांना बाहेर निघण्यास मज्जाव केला आहे. तर या भागात बिबट्याची दहशत कायम आहे.
सेंदूरवाफा बिरसामुंडा चौक, शासकीय तंत्रनिकेतन अभियांत्रिकी महा-विद्यालय परीसरात पाच दिवसांपासून बिबट्या वाघाला मुक्त संचार करतांना नागरीकांनी पाहीले. त्यांचे छायाचित्रण साकोली सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले होते. याबाबत नगराध्यक्षा देवश्री कापगते,नगरसेविका वैशाली लांजेवार, शिवसेनेचे राधेश्याम मुंगमोडे,त्रिवेणी चौधरी, पुष्कर करंजेकर आणि जनतेने या भागात पाहणी केली.
वनविभाग वन परिक्षेत्र अधिकारी सचिन कटरे, नगरपरिषद मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांना निवेदन दिले. प्रशासनाने या भागात पाहणी सुद्धा केली आहे. १५ जानेवारी व शनिवार १७ जानेवारीला सकाळी त्या भागात राहणारे रवि झोडे आणि निशिकांत गोबाडे यांच्या घराजवळ वाघांच्या पायांचे ठसे आढळली आहेत. प्रशासनाच्या वतीने सावधतेचा इशारा म्हणून पालकांनी लहान मुलांना सायंकाळच्या वेळेस बाहेर खेळण्यास जाऊ देऊ नये तसेच एकट्याने परिसरात फिरू नये असे कळिवण्यात आले आहे.









