एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील २९ नगरसेवक हॉटेलमध्ये मक्कामी

मुंबई :- देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेचा निकाल लागला अनब गुवाहाटीत गाजलेल्या काय झाडी काय डोंगर या शहाजीबापूंच्या फेमस डॉयलॉगची आठवण झाला. शहाजीबापूंची आज अचानक आठवण येण्याचं कारण म्हणजे, मुंबई महापालिकेच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंनी उचलेलं पाऊल. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन होईपर्यंत, शिवसेनेच्या नवनिर्वाचित २९ नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे, एकनाथ शिंदेंना मुंबईतले शिवसेनेचे नगरसेवक फुटण्याची भीती वाटतेय का? एकनाथ शिंदेंना नेमका कुणावर भरवसा नाही? मुंबईत ठाकरेंना महापौर बसवणं शक्य होईल? यासह अनेक प्रश्नांना जन्म घातलाय तो एकनाथ शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्स निर्णयाने. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र लढलेल्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला मोठं यश मिळालं.

मात्र, यातलं मोठं यश फक्तभाजपलाच मिळालं असून शिंदेंच्या शिवसेनेला केवळ २९ जागा जिंकता आल्या. मात्र, तरीही मुंबईत निवडून आलेल्या शिवसेना नगरसेवकांचा मुक्काम हॉटेलमध्ये हलवण्यात येत आहे. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन होईपर्यंत, शिवसेनेच्या २९ नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या नगरसेवकांची बेरीज केल्याशिवाय, भाजपप्रणित महायुतीला ११४ ची मॅजिक फिगर गाठणं शक्य नाही. महायुतीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ठाकरे बंधू शिवसेनेचे नगरसेवक फोडू शकतात, अशी भीती एकनाथ शिंदेंना सतावत असल्याची राजकीय वतुर्ळात जोरदार चर्चा आहे.

याच भीतीपोटी एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मुंबईतल्या नगरसेवकांचा मुक्काम हॉटेलमध्ये हलवल्याचं बोललं जातंय. एकनाथ शिंदेंचं टेन्शन का वाढलं असावं? या प्रश्नाचं उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी केलेलं ॲनालिसीसही विचार करण्यासारखंच म्हणावं लागेल.फोडून आलेली माणसं टिकवण्याचं टेन्शन, कदाचित त्यांना भाजपची भीती वाटतेय, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी यॉर्करचा मारलाय. उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर एकनाथ शिंदे उत्तर देणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष असेलच, मात्र तूर्तास देवेंद्र फडणवीसांनी महायुतीचे कॅप्टन म्हणून लगेच उत्तर दिलंय. कुठलीही पळवापळवी होणार नाही, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *