प्रकाश विद्यालय अड्याळ येथील मुलींची १७ वर्षे वयोगटाखालील राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड
दै. लोकजन वृत्तसेवा अड्याळ ः- प्रकाश विद्यालय अड्याळ येथील मुलींनी १७ वर्ष वयोगटाखालील क्रिकेट स्पर्धेत विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरावर गेले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील मुलीचा संघ राज्यस्तरावर क्रिकेट खेळणार असल्याची पहिलेच वेळ आहे.
प्रकाश विद्यालय अड्याळ येथील मुलींची १७ वर्ष वयोगटा खालील क्रिकेट स्पर्धामध्ये विभागीय स्तरावर यश केला. संघात कर्णधार प्रिया चाचेरे, उपकर्णधार दिक्षा करवाडे, यष्टिरक्षक लक्ष्मी बोरकुटे, कावेरी बावनकुळे, श्रद्धा गोडसेलवार, शर्वरी द्यारणे, कशीश रामटेकेसाक्षी शिवणकर, नंदिनी कामठे, तेजस मांढरे, नव्या देशमुख, शशी निकुडे, किंजल सांगाडे आणि श्रुती कावळे यांचा समावेश आहे. त्यांनी नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विजेत्या मुलींनी आपल्या या यशाचे श्रेण मुख्य प्रशिक्षक दिपक देशकर, सहाय्यक प्रशिक्षक गुणवंत खंडाईत, प्रकाश कनिष्ठ महाविद्यालय अड्याळचे प्राचार्य धुर्वे, पर्यवेक्षक कुंडलिक दिहारी व कर्मचाऱ्यांना दिले आहे. मुलींचे परीसरात कौतुक होत आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मुलींचा संघ रवाना झाला आहे.









