विद्यार्थ्यांनो आई-वडिलांचे स्वप्न साकार करा -नरेशबाबू दिपटे

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी:- नटवरलाल जशभाई पटेल कला व वाणिज्य महाविद्यालय मोहाडी द्वारा स्व. मनोहरभाई पटेल जयंती पर्वानिमित्त मोहाडी तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयात घेण्यात आलेल्या टॅलेंट सर्च परीक्षेचा पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात मोहाडी तालुक्यातील ७५ गुणवंतांना सन्मानित करण्यात आले. नटवरलाल जशभाई पटेल महाविद्यालय मोहाडीच्या सभागृहात आयोजित या पारितोषिक वितरण सोहळ्याची सुरुवात स्व. मनोहरभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरेंद्र पवार हे होते.

प्रमुख मार्गदर्शन म्हणून ख्यातनाम पत्रकार गोपालकृष्ण मांडवकर, तुमसरएल. आय. सी. चे विकास अधिकारी नरेशबाबू दिपटे उपस्थित होते. गोपालकृष्ण मांडवकर यांनी विद्यार्थ्यांनी आपली आवडनिवड जोपासण्यासोबतच आपल्यातील वेगळेपण ओळखून त्या आधारे आपल्या आयुष्याची वाट वाटचाल करावी असे सांगितले. नरेशबाबू दिपटे यांनी गरिबीला देणगी समजून तिच्याशी दोन हात करण्यासाठी शिक्षणाचे शस्त्र प्रभावीपणे वापण्याचे आवाहन केले. जीवनात ध्येय मोठे ठेवून आव्हान स्वीकारा आणि आईवडिलांचे स्वप्न साकार करा असे सांगितले.

अध्यक्षीय मार्गदर्शनातून प्राचार्य डॉ. सुरेंद्र पवार यांनी महाविद्यालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देऊन विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय कटिबध असल्याचे सांगितले. टॅलेंट सर्च परीक्षेतील सहभागी सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय मोहाडी, सुदामा कनिष्ठ महाविद्यालय मोहाडी, पीएम.श्री.जि.प.कनिष्ठ महाविद्यालय मोहाडी, नवनीत कनिष्ठ महाविद्यालय खराशी, स्व.पांडुरंग बुरडे कनिष्ठ महाविद्यालय आंधळगाव, पीएम.श्री.जि.प.कनिष्ठ महाविद्यालय आंधळगाव, नवप्रभात कनिष्ठ महाविद्यालय कांद्री, सोसायटी कनिष्ठ महाविद्यालय उसर्रा, मनीराम माटे कनिष्ठ महाविद्यालय खापा, श्रीराम कनिष्ठ महाविद्यालय बेटाळा, ईंदु मेमोरियल कनिष्ठ महाविद्यालय हरदोली, मेजर धनसिंग थापा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोहाडी, नवप्रभात कनिष्ठ महाविद्यालय वरठी, जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय जांब, जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय करडी या कनिष्ठ महाविद्यालयातील प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच प्रोत्साहनपर पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला, ज्या शाळेनी टॅलेंट सर्च परीक्षेत सहभाग घेतला अशा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महेशकुमार भैसारे यांनी केले. संचालन प्रा. नरेश आंबिलकर, डॉ. विजया राऊत यांनी तर आभार डॉ. ज्योती पांडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रमोद वरकडे, डॉ. गणेश वानखेडे, डॉ. रंजना डाकरे ,प्रा. आभा सिंगनजुडे, कन्हैया गुणेश्वर, अनिल चकोले, अजबलाल दमाहे,अभय राखडे, अभय उज्जैनवार, राहुल हेडाऊ, शुभम मोगरे आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *