भंडारा नगर पालिकेत शिवसेना गटाचे नगराध्यक्ष मदनकर यांना बिनशर्त समर्थन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- भंडारा नगरपालिकेतील शिवसेना गटाने नगराध्यक्ष मधुरा मदनकर यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. तसे पत्र आज शिवसेनेच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष मधुरा मदनकर यांना दिले. शिवसेना गटनेते राजेश धुर्वे यांनी दिलेल्या पत्रानुसार, नुकत्याच झालेल्या नगर पालिका निवडणूकीत पक्ष संघटन वाढीच्या हेतूने शिवसेना पक्षातर्फे स्वबळावर निवडणूक लढविण्यात आली. या निवडणूकीत शिवसेना गटाचे ५ नगरसेवक निवडूण आलेत. महाराष्ट्रात भाजप- शिवसेनाराष्ट्रवादी कॉंग्रेस अशी महायुतीची सरकार असल्यामुळे भंडारा शहरातही महायुती आबाधीत असने आवश्यक आहे.

सोबतच आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या अथक प्रयत्नाने भंडारा शहरात जलपर्यटन, काशी घाट पॅटर्न मोक्ष धाम, भंडारा चौपाटी, खामतलाव सौंदर्याकरण, सागर तलाव, मिस्कीनटॅक सौंदर्याकरण, नाटय गृह अशी अंदाजे ७०० कोटींची कामे शहरात सुरू असून हि कामे जलद गतीने पुर्ण व्हावीत व भंडारा शहर वासियांचे स्मार्ट सिटीचे स्वप्न पुर्ण व्हावेत याकरीता शिवसेना पक्षाच्या ५ ही सदस्यांचा कुठल्याही पदाची अपेक्षा न करता बिनशर्त पाठिंबा जाहीर करीत आहोत. भाजपच्या नगराध्यक्ष मधुरा मदनकर यांना संपुर्ण ५ वर्ष नगरपालीकेच्या सर्व विकास कामांमध्ये व संघटनात्मक कार्यातही आम्ही शिवसेना गटाचे पाचही नगर सेवक आपल्या सोबत राहू असेही कळिवले आहे. समर्थन पत्र देताना शिवसेना गट नेते राजेश धुर्वे, जिल्हा प्रमुख अनिल गायधने, लोकसभा संपर्क प्रमुख संजय कुंभलकर, उपजिल्हाप्रमुख सुरेश धुर्वे, नितीन धकाते, सुमीत घोगरे, मकसुद बंशी आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *