प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यावर करडी पोलिसांची कारवाई
दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा:- पोलीस स्टेशन करडी अंतर्गत आरोपी यशवंतराव सुकराम डोहळे (वय ५०) रा. आंबेडकर वार्ड करडी यांचे यशवंत किराणा दुकान गांधी वार्ड, करडी दुकानातून ४ हजार रुपयांचा नॉयलान मांजा जप्त करण्यात आला. करडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नूरूल हसन सा., मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश मोरे, स.पो.नि. नागलोत सा., यांचे मार्गदर्शनाखाली पोहवा. कुंभरे पो.स्टे. करडी, यांनी केली असुन पुढील तपास पोलीस स्टेशन करडी चे अधिकारी करीत आहेत.









