घटनेनंतर बिबट आणि वाघ दिसून आल्याची दहशत पसरविण्याच्या प्रयत्न रे…..आला….! तिरोड्यातील गादिया जिल्ह्यात बिबट्या….. आला….
गोंदिया:- पाच दिवसांपूर्वी शुक्रवार ९ जानेवारी रोजी तिरोडा तालुक्यातील खडकीडोंगरगाव या डोंगराळ जंगल भागात एका बिबट्याने त्याच्या पालकांसमोर घराच्या अंगणात चुलीजवळ ऊब घेत असलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याला पळवून नेत ठार केल्याची एक दुःखद घटनाघडली होती. याच गावी दुसऱ्याच दिवशी, बिबट्याने पुन्हा एका शेळीलाही ठार मारले होते.
या घटनेनंतर संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात इतरत्र बिबट्या दिसल्याच्या अफवा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्याशिताफीने वापर करून बिबट्यांचे बनावट फोटो समाज माध्यमावर प्रसारित होत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील वनक्षेत्रातील अनेक गावांमध्ये तसेच गोंदिया शहराच्या काही प्रभागात बिबट्या दिसून आल्याचेही याच माध्यमातून पसरविण्यात आले. तिरोडा तालुक्यातील दुःखद घटने नंतर गोंदिया मध्ये बिबट्या आणि वाघांच्या उपस्थितीबद्दल दहशतपसरवण्याचा प्रयत्न झाला. या आशयाची चित्रफिती देखील समाज माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने पसरविण्यात आली. या घटनेचे फोटो समाज माध्यमावर अधिकाधिक प्रसारित होत आहेत, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संदर्भात गोंदियाच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी सांगितले की तिरोडा तालुक्या मध्ये घडलेल्या घटना दुर्दैवी आहेत आणि वनविभाग त्या बिबट्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तथापि, गोंदिया वनक्षेत्रात अशा कोणत्याही घटना घडल्या नाहीत किंवा कोणत्याही वस्तीत बिबट्या किंवा वाघाच्याहालचालींबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. गोंदिया वनक्षेत्रात येणारे पांगडी, किडंगीपार, गंगाझरी, धामनेवाडा आणि भानपूर सारखे भाग जंगलाला लागून असल्याने या गावाजवळील परिसरात बिबट्या आणि इतर भक्षक प्राणी मुक्तपणे फिरतात हे ज्ञात आहे.
तथापि, तिरोडा तालुक्या मधील घटनांमुळे परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी वन विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. गोंदिया वनपरिक्षेत्रातील भागात बिबट्या आणि इतर प्राणी दिसल्याचा दावा करणारे समाज माध्यमावर फिरणारी चित्रफिती पूर्णपणे खोटे आणि खोटेच आहेत. त्यामुळे, नागरिकांनी या चित्रफीतीना गांभीर्याने न घेता अनावश्यकपणे घाबरून जाण्याची गरज नाही.









