“मी मोठ्या काकाचा पुतण्या, तुझ्या बापापेक्षा माझा काका खूप मोठा’, अजित पवारांची सुरेंद्र पठारेंवर टीका, भाजप नेत्यांनाही केलं लक्ष

पुणे:- पुण्यात १३ जानेवारी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे पुणे महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सगळ्याच पक्षाकडून तगडी तयारी सुरु आहे. १३ जानेवारी रोजी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांनी पुण्यात प्रचाराचा समारोप करण्याचं ठरवलय. १ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभा घेणार आहेत. उपमुखमंत्री रोड शो करुन जंग जंग पछाडताना दिसत आहेत.

आज देखील अजित पवार रोड शो घेणार आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे १३ जानेवारी रोजी पुण्यात आहेत आणि महत्वाच म्हणजे राज ठाकरेदेखील १३ जानेवारी रोजी दिवसभर पुण्यात आपल्या उमेदवारांच्या भेटी घेणार आहेत. त्यामुळ सगळ्याच पक्षाकडून पुण्याकडे जास्त लक्ष असल्याचं दिसून येत आहे. १३ जानेवारी रोजी अजित पवार अनेक प्रभागांमध्ये सभा घेत आहेत, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी चंदननगरमध्ये भाजपच्या उमेदवारांवरती हल्लाबोल केला आहे, भाजपचे उमेदवार सुरेंद्र पठारे यांच्यावरती टीका केली आहे.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, मी आपल्याला सांगतो मी शब्दाचा पक्का आहे. उद्याच्या निवडणूकीत तुम्हाला कोणाला तरी मत द्यायचा आहे. तुम्ही मागे अनेकांना मत दिली आहेत. पूर्वी ते घड्याळावर निवडून आलेले आहेत. तुम्ही सत्ता द्या, या भागातील टँकर माफियाचं नाही कंबरड मोडला ना च्यायला नावाचा अजित पवार सांगणार नाही. अजित पवार यांनी यावेळी नाव न घेता भाजपच्या नेत्यांवर टीका केली आहे. गजर कशा करता वाजतो. माणसांना उठवायला एकदा घड्याळाचं बटणं दाबून बघा काय करतो ते, इथले ड्रग्स वैगेरे जेचालेल आहे ते थांबवायचं आहे. मला इथे कळालं की, प्रभाग चार मधील तिकडचे उमेदवार हे टँकर माफिया आहेत. इथे जर कोणी दादागिरी करायचा प्रयत्न केला तर आम्ही पण काय कच्चे नाही. आमच्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला गेलं तर आम्ही पण काय सोडणार नाही, अशा शब्दांंत अजित पवारांनी इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *