बँगमध्ये नवजात बाळ आढळले

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- तालुक्यातील मानेगाव/सडक शेतशिवारातील नाल्याजवळ नवजात ८-१० दिवसाचे स्त्री जातीचे बाळ काळ्या बँगमध्ये आढळल्याची घटना मंगळवारी (ता. १३) दुपारी १ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. सदर बाळ जिवंत असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. घटनेचा तपास लाखनी पोलीस करीत आहेत.

मानेगाव /सडक ते पिंपळगाव /सडक या दरम्यान उद्वजित पाल सिंग भाटीया याचे शेत जमीनीला लागून असलेल्या नाल्याजवळ असलेल्या झाडाजवळ एका काळ्या रंगाच्या बॅगमध्ये स्त्री जातीचे बाळ असल्याचे शेतमालकाला दिसले त्याने लगेच पोलीस पाटील सुरेश मते यांना माहिती दिली त्यांनी लगेच पोलीस स्टेशन ला माहिती दिली. पोलीस निरीक्षक सुभाष बारसे आपल्या चमुसह घटनास्थळी पोहचले. बाळ जिवंत असल्याने त्याला लगेच उपचारासाठी लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून उपचार सुरु आहे. घटनेचा पोलीस हवालदार मिलिंद गभणे व पोलीस शिपाई कांतीस कराडे तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *