नोंदणीकृत धान उत्पादक शेतकरी खरिपाच्या बोनसपासून वंचित

 दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर ः- (१३ जानेवारी, भंडारा) भंडारा जिल्ह्यातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर नोंदणीकृत असलेल्या हजारो शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेला बोनस अजूनही मिळालेला नाही. यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणीमध्ये वाढ झाली आहे. हजारो शेतकरी अजूनही धान बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी केली असून, अनेकांनी प्रत्यक्षात आधारभूत केंद्रावर धानाची विक्रीदेखील केली आहे.

मात्र, केंद्रावर धान विक्री करणाऱ्या काही शेतकऱ्यांना बोनस मिळाले असून, उर्वरित २३०७ शेतकऱ्यांच्या खात्यात बोनसची रक्कम जमा करण्यात आली नाही. मागील खरीप पणन हंगाम सन २०२४-२५ वर्षा करीता केंद्रशासनाने मंजुर केलेल्या हमीभावा अतिरिक्त योजने अंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना (नोदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली किंवा नसो) धान उत्पादन करीता त्याच्या धान लागवडी खालील जमीन धारणेनुसार प्रतिहेक्टरी २० हजार रुपये या प्रमाणात (दोन हेक्टरच्यामर्यादित) प्रोत्साहनपर राशी अदा करण्यास शासनाकडून मंजुरी प्राप्त झाली होती. परंतु नोंदणीकृत २३०७ शेतकऱ्यांचे बोनस पासून अद्यापही वंचित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *