संपत्तीच्या वादावरून जावयाने केला सासऱ्याचा खून
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- संपत्तीच्या वादावरून मित्रासोबत मिळून जावयाने सासऱ्याचा खून करून प्रेत पुलाच्या खाली सिमेंटरच्या पायलीमध्ये लपवून ठेवल्याची घटना भंडारा तालुक्यातील कोकणागड येथे उघडकीस आली. किशोर धर्मा कंगाले (वय ६५) रा. भंडारा, ह. मु. कोकणागड असे मृतकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किशोर धर्मा कंगाले यांचा जावई आरोपी अमीत रमेश लांजेवार (वय ३५) रा. शिवाजी वॉर्ड, शुक्रवारी भंडारा यांचे सोबतसंपत्तीचे कारणावरून वाद होता. जावई व मुलगी हे मृतकाचे भंडारा येथील घरी राहण्यास आले असता जावयाच्या भितीने किशोर धर्मा हा त्याचा पुतण्या फिर्यादी मंगेश दुलीचंद कंगाले रा. कोकणागड याचे घरी आठ महिन्यापासून राहत होता. किशोर कंगाले हे दि. ९ जानेवारी रोजी कोणागड वरून शिंगोरी येथे त्याच्या मोटारसायकल क्र. एमएच ३६ सी ११५७ ने गेला होता. मात्र घरी परत आला नाही. त्याला पाहण्यासाठी गेले असता मोटारसायकल अर्धा कि. मी. अंतरावर रोडावर दिसून आली. तसेच सायंकाळी ६.२४ मिनीटाने धर्मा कंगाले यांनी मित्र सुनील चौधरी यास फोन करून त्याचा जावयी व जावयाचे मित्र यांनी त्यास रस्त्यात अटकावुन मारहाण करीत असल्याचे सांगितले होते असे फिर्यादीस सांगितले. गावातील इसम नामे मुरलीधर कंगाले यास शेळ्या चारत असतांनी मृतकाचे आधार कॉर्ड, पेन कॉर्ड, शर्ट व पांढऱ्या रंगाची बनियान रस्त्याच्या कडेला असलेल्या महादेव गिऱ्हेपुंजे यांचे शेतात पडलेले आहे असे सांगीतले. त्यावरून फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन कारधा येथे तक्रार दाखल केली होती.
दि. ११ जानेवारी रोजी मृतक किशोर कंगाले याचे प्रेत कोकणागड जाणाऱ्या डांबरी रोडाच्या पुलाचे सिमेंट पायली मध्ये जखमी स्थितीत रक्ताने माखलेल्या मृत अवस्थेत मिळुन आले. जावई व त्याचा अज्ञात सहकारी यांनी संगनमतकरून किशोर धर्मा कंगाले यास रस्त्यात अटकावुन, मारहाण करून व गळा दाबुन जिवानीशी ठार करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचे प्रेत पुलाच्या खाली सिमेंटच्या पायली मध्ये लपवुन ठेवल्याचे स्पष्ट झाले. फिर्यादी मंगेश दुलीचंद कंगाले रा. कोकणागड यांचे तक्रारीवरून पोलीस स्टेशन कारधा येथे कलम १०३ (१), १२६ (२), २३८, ३ (५) भा. न्या. संहीता २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तपास कारधाचे ठाणेदार गोकुळ सुर्यवंशी करीत आहेत.







