दिघोरी पोलिसांकडुन जुगार अड्ड्यावर धाड

दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदूर:- तालुक्यातील दहेगाव जंगल परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर दिंडोरी पोलिसांनी धाड घालून पाच आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यात मावेश रामकृष्ण बोरकर (वय ४८) रा. लाखांदूर, आकाश नरेंद्र टेंभुर्णे (वय २५) रा. वार्ड क्रमांक १४ लाखांदूर, गोविंदसिंग हरनामसिंग रामगडे (वय ५८), बलरामसिंग करतानसिंग बावरी (वय ४२) दोघेही रा. झिरोबा ता. लाखांदुर व कमलेशअंबालाल बन्सोड (वय ३८) रा. सावंगी ता. देसाईगंज जि. गडचिरोली यांचा समावेश आहे. दिघोरी पोलीस स्टेशनचे हवालदार मातेरे, शिपाई आचले यांनी गुप्त माहितीवरुन धाड घातली. त्यांचे ताब्यातून रोख रक्कम व चार मोटारसायकलसह एकूण १ लाख ७७ हजार २५० रुपयाचा आलं जप्त करण्यात आला. पोलीस स्टेशन दिघोरी गुन्हा नोंद करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *