मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेत राडा! भाजप अन् मनसे कार्यकर्ते एकमेकांना भिडले; एक जण जखमी, नेमकं काय घडलं?
मुंबई:- राज्यातील महापालिका निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून मुंबई महापालिकेकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. त्यामुळे, एकीकडे ठाकरे बंधू प्रत्यक्ष मैदानात उतरून जोरदार प्रचार आणि सभांचं नियोजन करताना दिसतायत. तर दुसरीकडे महायुती, महाविकास आघाडी आणि इतर प्रमुख पक्षही मोर्चे बांधणी करत असल्याचे चित्र आहे. त्यात आता पक्षाची धुरा संभाळणारे कार्यकर्तेही आता जोमाने कामाला लागले आहे.
दरम्यान मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. गोरेगाव पश्चिमेच्या प्रभाग नंबर ५८ मध्ये भाजप आणि मनसेमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडलीय. गोरेगाव पश्चिमेत अमृत नगरभागात प्रचाराचे टेबल लावण्यावरून भाजप आणि मनसेमध्ये राडा झाल्याची माहिती आहे.









