वाहनाच्या धडकेत वृत्तपत्र वाटणाऱ्याचा जागीच मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- सकाळी पेपर वाटप करण्यासाठी जात असलेल्यास भरधाव टाटा एस वाहन चालकाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज रविवार दि. ११ जानेवारी रोजी सकाळी ७.१९ वाजता भंडारा शहरात चोले हॉस्पिटलसमोर, राष्ट्रीय महामार्गावर घडली. शंकर भोजलाल पटले (वय ४५) रा. पळसगाव (डव्वा), ता. सडक अजर्ुनी, जि. गोंदिया ह. मु. ओमनगर गोंड टोली, भोजापूर असे मृतकाचे नाव आहे.

सविस्तर असे की, शंकर पटले हे भंडारा शहरात बऱ्याच वर्षापासून पेपर वाटण्याचे काम करीत होता. नेहमी तो सायकलनेच पेपर वाटप करीत होता. मात्र आज वेळ झाल्यामुळे त्यांची मोपेड क्र. एमएच ३६ एएस २४७० ने गेलाहोता. पेपर वाटप झाल्यानंतर भोजापूरकडे परत जात असतांना चोले हॉस्पिटल जवळ त्याच्या मोपेडला भरधाव टाटा एस वाहन चालकाने धडक मारून पळून गेला. यामुळे तो खाली पडून जागीच मृत्यू पावला.

अपघात घडताच विजय पारधी यांच्यासह आजूबाजुला असलेल्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना सामान्य रुग्णालय भंडारा येथे नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. मृतकाचे शवविच्छेदन सामान्य रुग्णालयात केल्यानंतर अंतिम संस्कार करण्यात आले. मृतकाची पत्नी ईशा शंकर पटले यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे कलम १०६ (१), २८१ भारतीय न्यास संहिता २०२३, १८४ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ठवकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *