मॉयल ने अनुकंपा नोकरीचा गळाच घोटला…..!
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- मॉयल (मॅग्निज खाण) प्रशासनाने दि. १ जानेवारी २०२६ पासून अनुकंपा नोकरी योजना बंद करण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे कामगार कुटुंबांच्या पोटावर थेट लाथ मारण्यासारखा असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. सेवा काळात मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबांना मिळणारा सन्मानाचा रोजगार हिरावून घेऊन हेतुपुरस्सर त्यांच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट उभे करण्यात आले आहे.
मॉयल प्रशासनाकडून पर्याय म्हणून जाहीर करण्यात आलेली तथाकथित सामाजिक सुरक्षा योजना ही कागदावर शोभणारी आहे. मात्र प्रत्यक्षात निरुपयोगी असल्याचा आरोप कामगारबांधवाणी केला आहे.नोकरी म्हणजे फक्त पगार नव्हे, तर कुटुंबाचा आधारस्तंभ असतो, हे सत्य मॉयल प्रशासनाला कधी समजणार? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.









