डारा पोलीस दलातर्फे ऑल आऊट ऑपरेशन

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- जिल्ह्यात सर्वत्र शांतता राहावी व कोणतेही घातपाती कृत्य / अघटीत घटना घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी या कारणाने भंडारा पोलीस दला तर्फे ऑल आऊट ऑपरेशन दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी वेळ रात्री ७.०० वा. ते ११.०० वाजता दरम्यान पोलीस अधीक्षक नूरुल हसन भंडारा यांचे मार्गदर्शनात यशस्वीरित्या राबविण्यात आली. भंडारा जिल्हयातील ऑलआऊट ऑपरेशन दरम्यान ४९ अधिकारी व ३०९ अंमलदार हजर होते.

भंडारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन कार्यक्षेत्र अंतर्गत दारूबंदी कायदा अन्वये २२ कार्यवाही, जुगार ०२ कार्यवाही, मोटार वाहन कायदा अन्वये ३५४ केसेस, ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह १३कार्यवाही करण्यात आल्या. कारागृहातुन सुटलेले गुन्हेगार, अभिलेखा वरील गुन्हेगार, महितीगार गुन्हेगार एकूण १२९ इसम यांना त्यांची घरे चेक करण्यात आले. तसेच नाकाबंदी दरम्यान ९२२ वाहने चेक करण्यात आले. कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान गुन्हेगारांचा बंदोबस्त केला जातो, स्थानिक लोकांमध्ये विश्वास निर्माण केला जातो, शांतता व कायदा- सुव्यवस्था राखला जातो, दहशतवादी, नक्षलवादी कारवाया रोखल्या जातात कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान गुन्हेगारांचा बंदोबस्त केला जातो, स्थानिक लोकांमध्ये विश्वास निर्माण केलाजातो, शांतता व कायदा सुव्यवस्था राखल्या जातात हे कोंबिंग ऑपरेशन शांततेत पार पडले असून कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. भविष्यातही अशा प्रकारच्या कारवाया करण्यात येणार असून गुन्हेगारी प्रवृत्तीला थारा दिला जाणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *