मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून “50 खोके एकदम ओके” च्या घोषणा; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

मुंबई :- मुंबईत भाजप कार्यकर्त्यांकडून “५० खोके एकदम ओके” च्या घोषणा देण्यात आल्या. आतापर्यंत ठाकरे गट “५० खोके एकदम ओके” च्या घोषणा देऊन शिंदे गटाला डिवचत होते. मात्र, आपले मित्रपक्ष असलेल्या भाजपनेच अशा घोषणा दिल्यामुळे साहजिकच शिंदे गटाचे कार्यकर्ते संतापल्याचे दिसून आले. या सगळ्या प्रकरणावर आता स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कुठल्या कार्यकर्त्यांनी काय घोषणा दिल्या हे मला माहिती नाही. पण शिवसेना-भाजप मुंबईत मोठ्या ताकदीने लढत आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तर अशा घोषणा देण्याआधी एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारा, अशा घोषणा देणारे आज कुठे गेले ते एकदा तपासा, असा टोला मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी लगावला. दरम्यान, चेंबूरमधील वॉर्ड क्रमांक १७३ मध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या पूजा कांबळे आणि भाजपच्या शिल्पा केळुस्कर अशी मैत्रीपूर्ण लढत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *