खेळाच्या माध्यमानेच विद्यार्थ्यांमध्ये जिद्द व चिकाटी निर्माण होते- खा. प्रशांत पडोळे

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबतच शारीरिक विकास होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये असलेले सुप्त गुण खेळामुळेच बाहेर येतात. विद्यार्थ्यांना सर्वात आवडता खेळ असतो. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये बरेच सुप्त गुण लपलेले असतात. ते बाहेर आणणे व त्या मुलाला आपली कला दाखवण्यासाठी मंच हवा असतो. आणि हा मंच क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमाने त्यांना मिळतो. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये जिंकण्याची भावना निर्माण होते. देशात व जगामध्ये मोठे झालेले खेळाडू हे आपल्या ग्रामीण भागातील असून त्यांचा आदर्श घेऊन त्यांच्या जीवन चरित्राचे वाचन करावे.

खेळाच्या माध्यमानेच विद्यार्थ्यांमध्ये जिद्द चिकाटी निर्माण होते. असे प्रतिपादन खासदार प्रशांत पडोळे यांनी केले. ते दवडीपार येतील भंडारा तालुकास्तरीयकार्यक्रमांमध्ये उद्घाटक म्हणून बोलत होते. जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत भंडारा तालुक्याचे तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दवडीपार येथे आयोजित करण्यात आले. या क्रीडा महोत्सवाचे महत्त्व ग्रामीण भागात असून पालकांमध्ये खूप उत्साह असतो. त्यामुळे शांततेत क्रीडा स्पर्धांचा लाभ घ्यावा व आपल्या पाल्यांचे कौशल्य पहावे असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष कविता र्उईके यांनी केले. ते कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तीन दिवसीय चालणाऱ्या या क्रीडा सांस्कृतिक महोत्सवामध्ये विविध प्रकारच्या खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रेक्षणीय कवायत, समूहगीत,नृत्य, नाटिका लांब उडी,धावण्याचे स्पर्धा, रिले रेस,कबड्डी, खोखो असे विविध प्रकारच्या खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

सदर कार्यक्रमामध्ये तलवारबाजी मध्ये राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक आलेला लालबहादूर शास्त्री विद्यालय भंडारा येथील श्रेयस देवनाथ कुरंजेकर या विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला. दवडीपार शाळे च्या मुख्याध्यापिका राधा चौधरी यांचा सुद्धा शाल श्रीफळ देऊन सत्कारकरण्यात आला.उद्घाटनानंतर लगेच विद्यार्थ्यांच्या प्रेक्षणीय कवायतीला सुरुवात करण्यात आली. गावातील उपस्थिती लक्षणीय होती. सदर क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाबद्दल जिल्हा परिषद भंडारा सकारात्मक असून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे शिक्षकांनी सदर क्रीडा महोत्सवामध्ये सहकार्याची भावना ठेवून कार्य करावे. असे प्रतिपादन नरेश ईश्वरकर सभापती जिल्हा परिषद भंडारा यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी सदर महोत्सवामध्ये मार्गदर्शन केले. सदर महोत्सवाला कल्पना कुर्जेकर सभापती पंचायत समिती भंडारा नागेश भगत उपसभापती, अनिता भुरे, सदस्य जिल्हा परिषद, विनोद बांते गटनेते जिल्हा परिषद, प्रशांत खोब्रागडे माजी उपसभापती, संजय बोंद्रे,प्रभाकर बोदेले पंचायत समिती सदस्य, प्रमोद हुमने गटविकास अधिकारी, खिलोटे प्राचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती.सरपंच किरण मेश्राम यांनी गावातील परिस्थिती व गावांनी आयोजित केलेल्या या महोत्सव बद्दल माहिती दिली.

गावातील नागरिक अत्यंत उत्साही असून सदर महोत्सवा मध्ये विद्यार्थ्यांना जेवनाची तीनही दिवस व्यवस्था करण्यात आलेली आहे.त्यामुळे सर्वांनी शांततेत क्रीडा स्पर्धा पार पाडाव्या. असे आवाहन केले. शिक्षण विभाग भंडारा तर्फे गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांनी प्रास्ताविक केले. तालुक्यातील सर्व शिक्षक सदर क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी असून विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. विस्तार अधिकारी शिल्पा निखाडे, देवेंद्र शेंडे, गिरधारी भोयर, केंद्रप्रमुख भीमराव मेश्राम, सुधाकर कंकलवार, पुष्पलता भोयर, अशोक भुरे, अचल दामले, दुर्गाप्रसाद शेंडे, महेश जगनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन महेश यावलकर, परमेश्वर येणकीकर आभार शिल्पा निखाडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *