सार्वजनिक रोडवर केलेले अतिक्रमण भंडारा नगर परिषदेने काढले
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा शहरातील सार्वजनिक रोड व नाली वर केलेले अतिक्रमण भंडारा नगर परिषदेने आज दि. २ जानेवारी अतिक्रमणाची काढली. दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी लाऊडस्पीकर मुनादीद्वारे भंडारा शहरातील सार्वजनिक रस्त्यावर नालीवर तसेच सार्वजनिक जागेवर ओटा, पायरी, टिनाचे शेड, रस्त्यावर साहित्य तसेच इतर दुकानाचे कच्चे पक्के अवैध बांधकाम करून अतिक्रमण केलेल्या लोकांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत च्या सूचना देण्यात आलेल्या होत्या.
परंतु, अतिक्रमणधारकांनी आपल्या अतिक्रमण स्वतःहून न काढल्याने नगरपरिषद ने आज दि. ०२ जानेवारी २०२६ रोजी नगरपरिषद प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त मोहिमेतून खांब तलाव चौक ते खात रोडवरील अतिक्रमण काढून टाकण्यात आले. या मोहिमेमध्ये रस्त्यावरील ४० पानठेला, बांबूचे कच्चे दुकाने, टीनाचे शेडवर कार्यवाही करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले, पवन कनोजे, संकेत कोचे, मिथुन मेश्राम, सनी सोनेकर, पवन मोगरे, अंकुश हुमणे, आकाश मेश्राम, सागर रगडे, अरविंद गणवीर व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.









